गोल्डीची हळद लिरिक्स Goldichi Halad Lyrics in Marathi | Latest Haldi song 2020 - Pravin Koli, Keval Walanj, Sneha Mahadik Lyrics

Singer Pravin Koli, Keval Walanj, Sneha Mahadik
Music Pravin Koli
Song Writer Yogita Koli

हळद लागली नवरदेवा
मुंडावळ्या डोई ग सजल्या
तोरण माळी मांडवादारा
नटुनशी आयल्या बहीणी साऱ्या
आईचा लारका सोकरा
गोल्डी यो झायला नवरा राजा, नवरा राजा, नवरा राजा, नवरा राजा…

बॅण्ड वाजतय हळद गाजतय
बॅण्ड वाजतय हळद गाजतय
पोरा नाचतान भावाच्या हळदीला
पोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला
नाचू दे नाचू दे पोरांना नाचू दे
घालू दे घालू दे धिंगाणा घालू दे
पोरा नाचतान भावाच्या हळदीला
पोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला

झाला झगा मगा डीजे लागला हळदीला
सारे झिंगुणशी नाचताना गो मांडवाला
आपले भावाची हळद हाय ट्रेंडिंग ला
व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टा अन ट्विटर ला
इंग्लिश बोलन डॅशिंग चालन
हातात ब्रँडेड हाय आयफोन
हटके स्टाईल य फाय त्याचा दर्जा
हातान अंगठ्या न गल्यान सोन्याच्या चैन्या
नाचू दे नाचू दे पोरांना नाचू दे
घालू दे घालू दे धिंगाणा घालू दे
पोरा नाचतान भावाच्या हळदीला
पोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला

काकण सोन्याचा मामा आयला बांधायला
गुडघ्याला बाशिंग लावुन उतावला नवरा
सनी लिओनचा मजनू हाय यो कवरा
माहोल हळदीचा नशीला झाला सारा
कोंबरा कापीला गावठी चाखण्याला
कालवन सुकट पापलेट मावरयाचा
कोंबरा कापीला गावठी चाखण्याला
कालवन सुकट पापलेट मावरयाचा
ताव मारुनशी नाचतान गो मांडवाला
पोरा नाचतान, पोरा नाचतान, पोरा नाचतान, पोरा नाचतान
पोरा नाचतान भावाच्या हळदीला

पोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला