दर्याची दौलत लिरिक्स Daryachi Daulat Lyrics in Marathi - Sonali Sonawane, Sagar J Shinde Lyrics

Singer Sonali Sonawane, Sagar J Shinde
Music Sagar J Shinde
Song Writer Rohan Sakhare

पारू आयली गो दर्यावरी
पोर झायल्यान फिदा गो हिच्यावरी
पारू आयली गो दर्यावरी
पोर झायल्यान फिदा गो हिच्यावरी

तुझा साज हाय ह्यो लै न्यारा
माझा इष्काचा चढलाय पारा
मन झायलाय तुझावर फिदा ग पोरी
पीरमाचा रंग लै न्यारा

अशी चंदेरी रात नाही सोडणार हाथ
हे चंदन सजलंय तुझेसाठी
राणी दे गो इशारा माझेसाठी
देईन दर्याची डौलत तुझेसाठी

तुझ्या रूपाची जादू करे दिलेला काबू
तुझ्या केसाची बट मला येड लावतय
तुझ्या गालाव तील बघ शोभुनी दिसे
तुझ्या ओठाची लाली पागल करतय

जीव झुरतंय जीव झुरतंय
तुझ्यासाठी पोरी जीव झुरतंय
याद येतंय याद येतंय
राती तुझी मन याद येतंय

या गो निलया दर्यावरी
फिरवू इश्काची आपुन होरी
आपल्या दोघांची गो जोरी
कोळीवार्यान गाजलं भारी

हिरे मोत्यावाणी तुला सजवूनशी
बंगला बांधुनी गो पोरी तुझेसाठी
राणी दे गो इशारा माझेसाठी
देईन दर्याची डौलात तुझेसाठी

राणी दे गो इशारा माझेसाठी
देईन दर्याची डौलात तुझेसाठी

कस सांगू तुला जे मनानं हाय
जीव माझे तुझ्यावर जडला हाय
कास सांगू तुला जे मनानं हाय
जीव माझा तुज्यावर जडला हाय

वाट पाहूनशी तुझी र राजा
माझा दिलाची हालचाल झाली हाय
साथ देऊनशी मला नेऊनशी
राजा होईन मी तुझी राणी

दिला हाथ ह्यो माझा तुझे हाती
प्रेम मनानं भरलाय तुझेसाठी
राणी दे गो इशारा माझेसाठी
देयीन दर्याची डौलत तुझेसाठी

राणी दे गो इशारा माझेसाठी
देईन दर्याची डौलात तुझसाठी

हय्या हो हय्या हय्या हो
हय्या हो हय्या हय्या हो
हय्या हो हय्या हय्या हो
हय्या हो हय्या हय्या हो